PostImage

MH 33 NEWS

Oct. 27, 2024   

PostImage

मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; कोणाला कोणत्या …


 

 

मुंबई:-विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती आघाडीतील पक्षांसह इतर पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज (२७ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. यामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघामधून विजयसिंह पंडित, पारनेरमधून काशिनाथ दाते, फलटणमधून सचिन पाटील आणि निफाडमधून दिलीप बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 12, 2024   

PostImage

बल्लारपूरच्या सर्वांगिण विकासात कोणतीही कसर ठेवणार नाही - ना.श्री. सुधीर …


 

 *बल्लारपूर येथे कामगार स्नेहसंमेलन थाटात संपन्न* 

*चंद्रपूर, दि.१२ - देशातील महत्त्वाचे शहर म्हणून बल्लारपूरची ओळख आहे. देशातील बल्लारपूरमध्ये छोटा भारत वसलेला आहे. या शहराच्या शिक्षण, आरोग्य, रोजगारासह सर्वांगिक विकासात कोणतीही कसर ठेवणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.*

बल्लारपूर शहरातील सुभाष टॉकीत बसस्टॉप जवळील सभागृहात आयोजित अजय दुबे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कामगार स्नेहसंमेलनात ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी माजी आमदार जैनुद्दिन जव्हेरी, आयोजक अजय दुबे, प्रकाश देवतळे, नामदेव डाहुले, राकेश सोमाणी, राममिलन यादव, उमेश कुंडले,सुरज सिंग ठाकूर,राममिलन यादव, सेवासिंग कालरा , जसवंत सिंग, धर्मप्रकाश दुबे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर शहराला तहसीलचा दर्जा देण्याबाबत आलेल्या अडचणींचे प्रवास वर्णन केले. ‘बल्लारपूरला तहसीलचा दर्जा देऊ न शकल्यास राजकारण सोडण्याची शपथ घेतली होती. पण बल्लारपूर येथील कार्यकर्त्यांच्या सहकार्याच्या बळावर असाध्य वाटणारे कार्य देखील साध्य झाले,’ असे ते म्हणाले.

केंद्र आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त भगीनींना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील २ लाख ८ हजार भगिनींच्या खात्यात १५०० रुपये लवकरच जमा होणार असल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. 

पुढे म्हणाले,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर राज्य सरकारने आता लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील तरुणांना याचा लाभ होणार आहे. शिक्षणात गरिबी अडसर ठरू नये यासाठी मुलींना मोफत उच्च शिक्षणाची योजना देखील महाराष्ट्र सरकारने आणली आहे. कामगार बांधवांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून दर्जेदार हॉस्पिटल तयार करण्यात येत आहेत. बल्लारपूरच्या नजीक १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय तयार होत आहे. 

बल्लारपूर मधील अनेकांना घरांचे पट्टे नसल्याची मोठी समस्या आहे. किमान १२ हजार नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच यादृष्टीने कार्यवाही होईल, असा विश्वासही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिला. जात-पात, धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना विविध योजना आणि विकास कामांचा लाभ मिळावा यादृष्टीने कार्य करण्याचे आवाहन देखील ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले.


PostImage

News mh33 live

Aug. 7, 2024   

PostImage

खासदार डॉ. किरसान यांनी घेतली केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री …


खासदार डॉ. किरसान यांनी घेतली केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट

 

1980 च्या वनकायद्यात शिथिलता आणून रखडलेल्या सिंचन प्रकल्पाला गती देण्याची केली मागणी

 

गडचिरोली : खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री श्री भूपेंदर यादव यांची दिल्ली येते भेट घेतली व वन कायाद्यामुळे रखडलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कारवाफा, डुमीनाला, डरकानगुडा, पिपरी रिठ, पुलखल, तुलतुली, चेन्ना हे वनबाधित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वन संवरक्षण कायदा 1980 शिथिल करुन मंजुरी देण्याची विनंती केली. तसेच गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रात सतत होणारा वाघांचा व रानटी हतींचा धुमाकूळ बंद करुन होणारी जिवीत हानी रोखण्यासाठी या हिंस्त्र रानटी प्राण्यांना इतर ठिकाणी हलवून कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची विनंती केली सोबतच पिकाची नासाडी करनाऱ्या व जीवितला धोका निर्माण करनाऱ्या रानटी डुकरांचा सुद्धा बंदोबस्त करावा अशी मागणी खासदार डॉ. किरसान यांनी वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली.


PostImage

News mh33 live

Aug. 7, 2024   

PostImage

गडचिरोली जिल्यातील शेतकऱ्यांना पुरक व्यवसाय निर्माण करुन देण्यास प्रयत्नशील.माजी खा.अशोक …


गडचिरोली जिल्यातील शेतकऱ्यांना पुरक व्यवसाय निर्माण करुन देण्यास प्रयत्नशील.माजी खा.अशोक नेते

दिं. ०७ ऑगस्ट २०२४

धानोरा:- देशाचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या कल्पनेतील धोरणाला प्रतिसाद देत प्रायोगिक तत्त्वांवर सांसदीय संकुल विकास परियोजना द्वारे गडचिरोली जिल्ह्यात मुख्य व्यवसाय म्हणून शेती हा आहे.या शेतीवर धान्य उत्पादनांच्या व्यतिरिक्त कोणतेही उत्पादन घेतले जात नाही.

यासाठी शेतकऱ्यांचा सर्वागीण विकास व्हावा व शेतकऱ्यांचा उत्पन्न वाढवण्यासाठी पूरक व्यवसाय निर्माण करण्यासाठी धानोरा तालुक्यातील चातगांव परिक्षेत्रातील पंचविस गावातील आदिवासी शेतकऱ्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून , चातगांव परिक्षेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांना 25 पंचवीस गावे ही दत्तक घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी सांसदीय संकुल विकास परियोजने अंतर्गत एकतीस करोड, सत्त्यानशी लाख 31,87,00000 रुपये माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक जी नेते यांच्या विशेष प्रयत्नाने व पुढाकाराने मंजूर करून जवळजवळ अडीच हजार (2500) लाभार्थ्यांना दुधाळ दोन गाई प्रमाणे पाच हजार (5000)गायी वाटप होणार याकरिता आज दिंनाक ०७ ऑगस्ट २०२४ रोज बुधवारी धानोरा येथील पंचायत समिती सभागृहात मा.खा.अशोक जी नेते यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला.

 

या आढाव्यात सांसदीय संकुल विकास परियोजनेद्वारे चातगांव परिक्षेत्राचा पंचेविस गावातील आदिवासी शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय निर्माण करुन लाभ मिळावा यासाठी मा.खा.अशोक नेते यांनी यावर विस्तृत मार्गदर्शन केले. 

 

यावेळी संवर्ग विकास अधिकारी (BDO) सतीशजी टिचकुले, विस्तार अधिकारी ए‌. बी. ठाकरे,विस्तार अधिकारी के. पी. रामटेके,संसदीय संकुल वि. परि.गडचिरोली प्रमुख व मीडिया प्रमुख महाराष्ट्र प्रदेश भा ज पा अनुसुचित जमाती मोर्चाचे अक्षयजी उईके, अमोलजी चकनलवार, ता.महामंत्री धानोरा विजय कुमरे,शहराध्यक्ष सारंग साळवे तसेच या आढाव्याला प्रामुख्याने मोठ्या संख्येने ग्रामसेवक वर्ग उपस्थित होते.


PostImage

News mh33 live

Aug. 7, 2024   

PostImage

ओबीसीच्या न्याय हक्कासाठी पोंभूर्ण्यात दाखल झाली ओबीसी मंडल यात्रा


ओबीसीच्या न्याय हक्कासाठी पोंभूर्ण्यात दाखल झाली ओबीसी मंडल यात्रा 

 

-भारतीय ओबीसी महापरिषद पोंभूर्णा तालुका आयोजन समीतीचा पुढाकार

 

 

पोंभूर्णा : - ओबीसी युवा अधिकार मंचच्या वतीने जातीनिहाय जनगणनेसाठी ३ ते ७ ऑगस्ट दरम्यान विदर्भातील सात जिल्ह्यातून काढण्यात येणारी मंडल यात्रा दि.५ ऑगस्ट सोमवारला पोंभूर्णा येथील बस स्टँड परिसरातील सावित्रीबाई फुले चौकात दाखल झाली.या यात्रेचे जंगी स्वागत भारतीय ओबीसी महापरिषद पोंभूर्णा तालुका आयोजन समीतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.

 

            

७ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात मंडल दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जातीनिहाय जनगणनेचा महत्त्वाचा विषय घेऊन दि ३ ऑगस्ट पासून मंडल यात्रा काढण्यात आले आहे.ओबीसी समाजाकडून अनेक वर्षांपासून जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली जात आहे.मात्र केंद्र तथा राज्य शासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार ओबीसी समाजाची लोकसंख्या ५२ टक्के होती.परंतु १९३१ पासून तर आजपर्यंत जातीनिहाय जनगणना झाली नाही. त्यामुळे लोकसंख्येसह सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय परिस्थिती समजून येत नाही. जर भारताला महासत्ता बनायचे असेल तर सर्व घटकांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे.

विकासाच्या दृष्टीने धोरण ठरविण्यासाठी भारत सरकारकडे डेटा असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने भारताची जातीनिहाय जनगणना करावी.यासाठी ओबीसी, एस.सी., एस.टी. समाजात जनजागरण झाले पाहिजे या उद्देशाने मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे .

ओबीसी मंडळ यात्रेला मार्गदर्शन करण्यासाठी उमेश कोर्राम,डॉ.संजय घाटे,सतीश मालेकर,ॲड.पुरुषोत्तम सातपुते, प्रकाश पाटील मारकवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी यात्रेचे स्वागत करण्यासाठी भुजंग ढोले,सद्गुरू ढोले, राहुल सोमनकर,प्रदीप दिवसे,रुषी कोटरंगे, चरणदास गुरुनुले,जगन कोहळे, नंदकिशोर बुरांडे,कालिदास मोहुर्ले,विकास ठाकरे,नंदा कोटरंगे, आनंदराव पातळे, विनोद धोडरे,गुरूदास गुरनुले,गौरव गुरनुले, आदींची उपस्थिती होती.


PostImage

News mh33 live

Aug. 6, 2024   

PostImage

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मडावी परिवाराला उपचारासाठी आर्थिक मदत..!


माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मडावी परिवाराला उपचारासाठी आर्थिक मदत..!

 

अहेरी : तालुक्यातील नैनेर येथील रहिवासी मेंगा मडावी यांची पत्नी सौ.राजी मेंगा मडावी यांना प्रकृती ठिक नसल्याने काही दिवशी अगोदर अहेरी उपजिल्हा रुग्णालय येते भर्ती करण्यात आली.मात्र डाक्टरांनी त्यांच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले होती.

 

मेंगा मडावी यांच्या घरचा आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने मडावी कुटुंबियांना औषध आणि इतर खर्चासाठी अडचण भासत होती.सदर माहिती काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच त्या मडावी परिवाराला आर्थिक मदत करण्यात आले.

 

दरम्यान कंकडालवार म्हणले की'यापुढेही कोणत्याही कामासाठी आपण माझा संपर्कात रहा मी आपल्याला शक्य तो मदत करेन म्हणून मडावी कुटुंबियांना मोठा धीर दिला.त्यावेळी समस्त मडावी परिवारातील सदस्यांनी अजयभाऊ कंकडालवार यांचे आभार मानले आहे.

 

मदत करतांना वेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सरपंच अशोकभाऊ येलमुले,नगर सेवक प्रशांत गोडशेलवार,नरेंद्र गर्गम,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,शंकर सिडाम,सतिश पोरतेट,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडशेलवारसह आदी उपस्थित होते.


PostImage

News mh33 live

Aug. 6, 2024   

PostImage

आदिवासी, भटके - विमुक्त आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी भाई रामदास जराते भाई …


 

आदिवासी, भटके - विमुक्त आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी भाई रामदास जराते 

 

भाई शामसुंदर उराडे यांची मध्यवर्ती समीती सदस्यपदी नियुक्ती

 

गडचिरोली : भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्य २ व ३ ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे १९ वे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात पुढिल ४ वर्षांकरीता पक्षाच्या नवीन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. यात शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, भाई शामसुंदर उराडे यांची पक्षाच्या मध्यवर्ती समितीवर सर्वानुमते निवड करण्यात आली.

 

मागिल अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय राहून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी सातत्याने रस्त्यावरचा लढा लढणारे भाई रामदास जराते यांच्या कार्याची दखल घेवून पक्ष सभासदांनी सलग दुसऱ्यांदा मध्यवर्ती समितीवर निवड केली. मध्यवर्ती समितीनेही त्यांना दुसऱ्यांदा पक्षाच्या चिटणीस मंडळावर संधी दिली. अनुसूचित क्षेत्रातील कायदे आणि आदिवासी व भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा अभ्यास व त्यासाठी त्यांनी चालविलेला संघर्ष लक्षात घेत पक्षाच्या चिटणीस मंडळाने आता भाई रामदास जराते यांची आदिवासी, भटक्या - विमुक्त आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती आहे.

 

आदिवासी, भटक्या - विमुक्त आघाडीची पक्षाने आपल्यावर जबाबदारी सोपविल्याने अनुसूचित क्षेत्रातील कायदेभंग, बळजबरी प्रकल्प आणि आदिवासी, भटक्या - विमुक्तांवरील अन्याय अत्याचारा विरोधात राज्यभरात आवाज बुलंद करु, अशी प्रतिक्रीया भाई रामदास जराते यांनी दिली आहे.

 

भाई रामदास जराते व भाई शामसुंदर उराडे यांच्या निवडी बद्दल पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, जेष्ठ नेते माजी आमदार संपतबापू पवार पाटील, कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, सहचिटणीस बाबासाहेब देवकर, राहुल देशमुख, उमाकांत राठोड, प्रा.एस.व्ही. जाधव, प्रा. बाबुराव लगारे, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार पंडितशेट पाटील, बाबासाहेब देशमुख, मोहन गुंड, जयश्रीताई जराते आणि जिल्ह्यातील शेकापच्या शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिलेल्या आहेत.


PostImage

P10NEWS

July 19, 2024   

PostImage

माननीय. सांसद रामजी गौतम बसपा के महान मिशनरी नेता का …


 

THE GREAT LEDAR MP RAMJI GAUTAM (BSP) :-  महिने में दो दिन और साल के चौबीस दिन घर जाते है, और साल के 341 दिन और रात बीएसपी मिशन के लिए कड़ी मेहनत करनेवाला मिशनरी नेता ! 

मुंबई/17:- माननीय. सांसद रामजी गौतम बसपा के महान मिशनरी नेता: बलिदानी नेता जो महीने में दो दिन और साल में केवल चौबीस दिन घर जाते हैं! बसपा नेतृत्व के भरोसेमंद साथी, वह सात राज्यों के प्रभारी हैं, उन्हें 2024-25 के लोकसभा चुनावों के बाद महाराष्ट्र राज्य का प्रभारी बनाया गया है! महाराष्ट्र राज्य में बसपा की चालीस वर्षों की राजनीतिक स्थिति से बसपा नेतृत्व में भारी निराशा है, भले ही फुले शाहू अम्बेडकर आंदोलन का उद्गम स्थल बसपा ही क्यों न हो, राजनीतिक सत्ता से दूर रहने के कारणों पर गहन मंथन के बाद बीएसपी, मा. सांसद रामजी गौतम को महाराष्ट्र की जिम्मेदारी दी गई है, पहले सात राज्यों की जिम्मेदारी दी गई है! इसके कारण उन्हें अपने निजी पारिवारिक जीवन में काफी परेशानियों का सामना करना पड़ता है, घर के लोग उनकी व्यस्त जिंदगी से नाराजगी दिखाते हैं, इस कारण मेरा बच्चा बात नहीं करता उन्हें अपने बच्चों को स्कूल से दूर देखने स्कूल के बाहार खड्डा रखना पडता है,इस के लिए दो दिनों के लिए घर जाना पड़ता है । निजी जिवन मैनें खो दिया, उन्होंने ऐसा जीवन फुले शाहू अम्बेडकर जिन्होंने मिशन मिशन में काम करने के लिए अपना निस्वार्थ जीवन बिताया। सांसद रामजी गौतम साहब कहते हैं जब मैं अपने समुदाय के लोगों को देखता हूं तो उन्हें मान सम्मान नहीं मिलता है, हमारी महिलाओं और लड़कियों के साथ बलात्कार होते है, हाल ही में महाराष्ट्र के सोलापुर जिले में! कितने लोग जानते हैं, नौवीं कक्षा की एक दलित लड़की के साथ बलात्कार किया गया और उसकी जगह काटकर उसे प्रताड़ित किया गया! लेकिन आज भी हर दिन  हमारे समाज पर अन्याय अत्याचार होते रहते है, हम जैसे लोग इसके लिए नहीं लड़ेंगे, कौन लड़ेगा और हमारी बहनजी कहती है कि निराश मत हो, राजनीति नहीं चलती, सत्ता नहीं आती, लेकिन हमारे समाज के लिए काम करते रहना हैं. फुले - शाहू- अंबेडकर-कांशीराम मिशन रुकनी नहीं चाहिए, फिर से हम सब भूलकर काम में लग जाते हैं!    सात राज्यों में काम करने के लिए मुझे प्रभारी बनाके  भेजा गया ! लेकिन जब मुझे महाराष्ट्र की धरती पर भेजा गया और बहनजी ने मुझे महाराष्ट्र का प्रभारी बना दिया! तब मुझे बहुत गर्व महसूस हुआ, कि डॉ. बाबासाहेब अम्बेडकर साहब की कर्म भूमि पर काम करने का मौका मिला और हमारी प्रेरणा श्रीमान कांशीराम साहब की भी कर्म भूमि मानी जाती है, ऐसी भूमि पर मुझे का करने का मौका मिला है मुझे खुद पर गर्व महसूस हो रहा है, कुछ करने का मौका मिला है! और मैं मेरा काम अपनी पूरी ताकत से  करूंगा! 40 साल में जो नहीं हुआ वो इतिहास बनेगा, अगर आप महाराष्ट्र की जनता का साथ चाहिए और उन पर भरोसा दिखायेंगे तो मैं जरूर पूरी कोशिश करूंगा, अगर मुझपर मेरे कामपर विश्वास नहीं है तो अभी बताओ, मैं महाराष्ट्र छोड़ दूंगा आजतक महाराष्ट्र लोकसभा चुनाव और महाराष्ट्र के अबतक की घटनाओं मेरा कोई योगदान नहीं था! क्योंकी अबतक यहा काम करनेवाले प्रभारी दुसरे लोग थे, एकपल ऐसा लगा की सब छोडकर चला जाऊ लेकीन सामने पढ़ी किताब में मा‌ कांशीराम साहाब का सायकल स्वार फोटो देखा नहीं मुझे संघर्ष करना है, लेकीन आप बताये और अपनी बहनजी  से कहूंगा कि महाराष्ट्र का युनिट बंद कर दे! क्या ये आप चाहते है, इसपर महाराष्ट्र प्रदेश के सभी पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने रामजी गौतम साहब का समर्थन करके यह विश्वास दिया कि हम उनके साथ हैं, माननीय. सांसद रामजी गौतम साहब के फुले - शाहू - अंबेडकर- कांशीराम मिशन के जुनुन को देखने के बाद सभी पदाधिकारियों एवं कार्यकर्ताओं में जोश बढ़ गया!  और उनके प्रति सम्मान बढ़ गया! ऐसा निस्वार्थ नेतृत्व और निस्वार्थ नेता जो महिने में दो दिन और साल के चौबीस दिन घर जाता है, और साल के 341 दिन और रात बीएसपी मिशन के लिए कड़ी मेहनत करता है! इसलिए हमारे बुज़ुर्ग कह गए, कि घटनाएँ चाहे जो भी हों, भविष्य में इतिहास बन जाती हैं!                                                            मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                            (EDITOR IN CHIEF)


PostImage

News mh33 live

July 5, 2024   

PostImage

कामाच्या चौकशीसाठी उपोषणावर बसलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार …


कामाच्या चौकशीसाठी उपोषणावर बसलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतले उपोषण मागे!

 

उपोषण मंडपाला निवासी उपजिल्हाधिकारी विवेक सांळूखे यांची भेट!

 

गडचिरोली : अहेरीला जिल्हास्थानाचा दर्जा देण्यात आला असला तरी अद्याप या ठिकाणी असलेल्या अप्पर जिल्हाधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांचे अधिकार प्रदान करण्यात आले नाही.याशिवाय अहेरी शहरात ले-आऊट संदर्भात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य कामे करण्यात आली असून या कामांच्या चौकशीसाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 तारीखेला बसले अखेर आज निवासी उपजिल्हाधिकारी विवेक सांळूखे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली व सदर मागण्या चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तेव्हा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आज उपोषण मागे घेतले.

 

अहेरी शहरात नगररचनाकार,महसूल विभाग,तलाठी कार्यालय व प्रशासकीय अधिकार्‍यांच्या संगणमताने अनधिकृत ले-आऊटला परवानगी देण्यात आली आहे.अनेक ले-ऑउटला ओपन स्पेस नाही.तर अनेक ले-आऊट हे पुरग्रस्त क्षेत्रात येत असतानाही अशा ले-आऊटची अहेरी शहरात सर्रास विक्री सुरु आहे. देण्यात आलेल्या प्रापर्टी कार्ड संदर्भातही त्यांनी आक्षेप नोंदविला आहे.यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे अनेक तक्रारी करूनही प्रशासनाने कुठलीच दखल न घेतल्याने अखेर कंकडालवार यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. 

 

अहेरी नगरपंचायत हद्दीतील नियमबाह्य ले-ऑऊटच्या कामांची चौकशी करून संबंधित दोषी अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कंकडालवार यांनी केली होती 

 

अहेरी येथील एका जमिनीला अकृषक करण्यासाठी (एनएपी-34) मृत व्यक्तीला जीवंत दाखविण्यात आले.तर आदिवासीची जमिनी गैर आदिवासींना विक्री करताना कुठल्याही प्रकारची शासनाची परवानगी न घेता विक्री करण्यात आली आहे.या प्रकरणातील सर्व दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी कंकडालवार यांनी केली आहे.जोपर्यंत दोषींवर कारवाई केली जात नाही.तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याचा इशाराही अजय कंकडालवार यांनी दिला होता अखेर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी आज कंकडालवार यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणकर्ता अजय कंकडालवार यांची उपोषण मागे घेतले.

 

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षा नेते मा.श्री.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांचेशी दूरद्वानी द्वारे सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.सदर बाबी लक्षत घेऊन आपण जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली सामोरील अमरण उपोषण थांबवण्यात आली आहे.

 

यावेळी हणमंतू मडावी सेवा निवृत्त वन संवरक्षक व आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष गडचिरोली,रोजा ताई करपेत नगर पंचायत नगर अध्यक्ष अहेरी,प्रशांत भाऊ गोडसेलवार नगर पंचायत नगर सेवक अहेरी ,हसन गीलानी माजी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष गडचिरोली , सतीश भाऊ विधाते ,रुपेश टिकले परिवहन सेलचे काँग्रेस अध्यक्ष गडचिरोली,मनोहर भाऊ पोरेट्टी माजी जी.प उपाध्यक्ष, गोरव येनपरेड्डीवार, अण्णा जेट्टीवा, निकेश गद्देवार, संमया पसुला माजी जी. प अध्यक्ष,, ,कार्तिक भाऊ तोगम माजी उप सरपंच,सुनीता ताई कुस्नाके माजी जी. प.सदस्य,सुरेखा ताई आलम माजी सभापती प. स.अहेरी, गीता चालुरकर माजी उपसभापती अहेरी,अजय नैताम माजी जी. प सदस्य ,स्वप्नील दादा मडावी, अशोक येलमुले ,सां.का,राजू दुर्गे , कवडू चलावार, हनीप शेख,तस्सू भैय्या,राकेश सडमेक,सचिन पांचार्या,प्रकाश दुर्गे,दिवाकर आलम,संदीप कोरेत,शिवराम पुल्लुरीसह आदी उपस्थित होते.


PostImage

News mh33 live

July 5, 2024   

PostImage

१८ ते २० वर्षाच्या बहिणी सरकारच्या बहीणी नाहीत का?


१८ ते २० वर्षाच्या बहिणी सरकारच्या बहीणी नाहीत का?

 

माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांचा सवाल 

 

चामोर्शी : अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात मांडला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा होता. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना मुलींचं मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेची घोषणा केली. १ जुलैपासून या योजनेची अंमलबजावी करण्यात आली.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' अंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. जुलै २०२४ पासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्काळ लागू झाली आहे. पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. 

मग १८ वर्षे पूर्ण झालेल्या बहिणी मतदान नोंदणी करून मतदान करतात मग या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ का नाही? मग मतदान करणारी ही सरकारची लाडकी बहिण नाही का? असा सवाल माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांनी उपस्थित केला आहे. २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे त्याकरिता १८ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ देण्यात यावा अशीही मागणी रुपाली पंदिलवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे


PostImage

News mh33 live

July 3, 2024   

PostImage

लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा - शिवसेना …


लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा - शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे 

 

आष्टी दि. ३ (प्रतिनिधी) शिंदे सरकारने राज्यातील महीलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून यामुळे २१ ते ६५ वर्षे वयाच्या महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. यासाठी शासन दरवर्षी ४६००० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. तरी लाभास पात्र - असणाऱ्या जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा व माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरताना महिलांचे आर्थिक पिळवणूक होणार नाही याची दक्षता दखल संबंधितांनी घ्यावी असे आवाहन व इशारा शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे यांनी दिला आहे. शिंदे सरकारच्या माध्यमातून युवा, शेतकरी, दुर्बल - महिला अशा विविध घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम करण्यात येत आहे त्याचा प्रचार व प्रसार वेगाने करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी आपल्या पदाधिकाऱ्यांना केल्या.


PostImage

News mh33 live

July 2, 2024   

PostImage

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार हे उपोषणाला का बसले,पहा


माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार हे उपोषणाला का बसले,पहा 

 

गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांची अनेक गंभीर समस्या घेऊन आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रमुख मागण्या काय आहेत पाहुया.

 

१) १/४/२०१० मध्ये अहेरी जिल्हा निर्मीतीचा निर्णय शासन दरबारी झालेला आहे. अहेरी जिल्हांतर्गत अप्पर जिल्हाधिकारी यांना जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार अहेरी, भामरागड,सिरोंचा,एटापल्ली या चार तालुक्याकरीता देण्यात यावे

 

२) अहेरी नगरपंचायत हद्दीतील नियमबाह्य ले-आऊट मध्ये केलेल्या कामाचा निधी,ले-आऊट धारकांकडून वसुली करण्यात यावा व अहेरी-चेरपल्ली येथील रस्त्याच्या डांबरीकरणात नियमबाह्य झालेल्या कामाची चौकशी करुन संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.

 

३) मौजा-अहेरी येथील सर्व्हे क्र. २०७ च्या जमिनीचे मालकी हक्कदारांच्या मय्यतीनंतर खोटे संमती दाखवुन पोट हिस्सा केलेल्या प्रकरणाची व सदर मृत व्यक्तीला जिवंत दाखवुन एनएपी-३४ करीता मागणी केलेल्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. 

 

४) अहेरी नगरपंचायत हद्दीतील मा. उपविभागीय अधिकारी साहेबांनी दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघण करुन ले-आऊट धारकांनी केलेल्या अनधिकृत प्लॉट खरेदी केलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन आदेश रद्द करण्यात यावे.

 

५) ले-आऊट मध्ये केलेल्या कामांची शासकीय निधी ले-आऊट धारकांकडून वसुल करण्यात यावे.

 

६) प्रापर्टी कार्ड क्र. १४०९, सिट क्र. ०९ ची कायदेशीर चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी.

 

७) अहेरी नगरपंचायत हद्दीतील नियमबाह्यरित्या केलेले डांबरीकरण कामांची चौकशी करून कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी.

 

८) एन.जी. पठाण, उप-अधिक्षक भूमी अभिलेख,अहेरी यांच्या कार्यकाळात झालेले संपूर्ण फेरफार व संपूर्ण प्रॉपर्टी कार्ड तसेच गावठाण अहेरी,आलापल्ली,नागेपल्ली,वांगेपल्ली येथील एनएपी- ३४ च्या सर्व जामिनीचे चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी.

 

९) प्रापर्टी कार्ड क्र.१४०९ सिट क्र. ०९ मध्ये आदिवासी प्रापर्टी कार्ड गैर आदिवासी यांच्याशी खरेदी विक्री करण्यात आले असुन आदिवासी प्रापर्टी गैर आदिवासी खरेदी-विक्रीची चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी.

 

१०) अहेरी साजा क्र. ०१ मध्ये अतिक्रमण नोंदवहीत खोडतोड व हेतुपरस्पर चढविण्यात आलेले नावांची सखोल चौकशी करुन तसेच उप अधिक्षत भूमी अभिलेख अहेरी येथील अतिक्रमण नोंदवहीची संपूर्ण चौकशी करुन दोषर्षीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. 

 

११) उप अधिक्षक कार्यालय अहेरी येथे जुने प्रापर्टी कार्ड ऑनलाईन करण्यात आले असुन,त्यांचे जुने प्रापर्टी कार्ड नुसार ऑनलाईन प्रापर्टीकार्ड करण्यात आले नाही याची चौकशी करण्यात यावी. 

 

१२) अहेरी गावठाण येथील सन २०२१-२२ मध्ये सर्व नकाशात ग्रामपंचायत रस्ते म्हणून ७/१२ मध्ये नोंद असलेल्या सन १९७४-७५ मध्ये झालेल्या सर्वेनुसार गावठाण नकाशात ते रस्ते नसल्याचे दिसून येत आहे. सन १९७४-७५ मध्ये झालेले सर्वे मध्ये रस्ते गायब असल्याची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्यात यावी.

 

१३) दुय्यम निबंधक कार्यालय अहेरी यांच्या कार्यकाळात झालेल्या खरेदी-विक्री प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.

 

१४) वांगेपल्ली व चिचगुडी ग्रामपंचायत हद्दीतील ले-आऊट उपविभागीय अधिकारी साहेब यांचे आदेशानुसार विक्री न करता परस्पर संपूर्ण प्लॉट विक्री करण्यात आले असुन,साहेबांच्या आदेशाचे पालन न करता ज्यांनी ज्यांनी विक्री केले त्या प्लॉटची चौकशी करुन आदेश रद्द करण्यात आदि मागण्यांना घेऊन अजय कंकडालवार यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केले आहे.जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


PostImage

News mh33 live

July 2, 2024   

PostImage

प्राणहिता कॅम्प ते अहेरी पर्यंत रस्ता बांधकाम लवकरात लवकर पूर्ण …


प्राणहिता कॅम्प ते अहेरी पर्यंत रस्ता बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करा : अन्यथा आंदोलन!

 

कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली यांना अजय कंकडालवार यांनी दिले निवेदन..!

 

अहेरी : सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली अंतर्गत सुरू असलेल्या आलापल्ली रोड वरील प्राणहिता कॅम्प ते अहेरी पर्यंत रस्त्याला सुरुवात होऊन भरपुर कालावधी झालेला आहे.सदर काम कासव गतिने सुरू असल्यामुळे या रस्त्याने शाळेत जाणारे विद्यार्थी वेगवेगळ्या विभागात असलेले अधिकारी/कर्मचारी व नागरिक दररोज दुचाकी व चारचाकी तसेच बसणे ये-जा करीत असतात. सदर वाहनधारकांना अपूर्ण व कासव गतिने सुरू असलेल्या कामामुळे नाहक त्रास सहन करावे लागत असुन रस्त्याच्या कडेला गिट्टी टाकुन असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे.सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे सदर रस्त्याचे चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे.नियमानुसार सदर रस्त्याचे काम ७-८ दिवसात पूर्ण करण्यात यावे.अन्यथा दिनांक ०९/०७/२०२४ रोजी आदोलन उभारण्यात येईल असा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी निवेदनातून दिला आहे.

 

सदर निवेदन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली,कार्यकारी अभियंता,अप्पर जिल्हाधिकारी अहेरी,यांना माहितीस्तव व कार्यवाहीस्तव निवेदन पाठविण्यात आले आहे.


PostImage

News mh33 live

July 2, 2024   

PostImage

भगिनींनो तातडीने गोळा करा कागदपत्रे ! 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'साठी …


भगिनींनो तातडीने गोळा करा कागदपत्रे !

 

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'साठी हालचाली सुरू

 

 

गडचिरोली, दि. १ (प्रतिनिधी) राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील भगिनींना तातडीने कागदपत्रे गोळा करण्याची गरज आहे.

सोमवार १ जुलैपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होत असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ ही आहे. मुदत संपल्यानंतर या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची पाळी येऊ शकते, असे बोलले जात आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. पात्र महिलेला स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा १, ५०० रूपये इतकी रक्कम दिली जाईल. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंतच्या महिलांना लाभ मिळेल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे अशी अट आहे.

 

असे आहे वेळापत्रक अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात

 

जुलै, २०२४, अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक १५ जुलै. तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक १६ जुलै. तात्पुरत्या यादीवरील तक्रार / हरकती प्राप्त करण्याचा कालावधी १६ जुलै ते २० जुलै. तक्रार/ हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी २१ जुलै ते ३० जुलै.

 

या कागदपत्रांची गरज

 

उत्पन्नाचा दाखला सन २०२५ पर्यंत वैध असणारा असावा, जन्माचा दाखला, टि. सी झेरॉक्स, डोमेसाईल प्रमाणपत्र, रेशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्ड, लाभार्थी नावाने बैंक पासबुक झेरॉक्स. तसेच केंद्र, राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे १,५०० रूपये पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल. राज्यातील २१ ते६० यावर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यत्तत्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र राहतील.


PostImage

News mh33 live

July 1, 2024   

PostImage

अवघ्या दोन तासात मागण्या पूर्ण,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन …


अवघ्या दोन तासात मागण्या पूर्ण,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन मागे...!

 

 

सिरोंचा तालुक्यातील भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) विभागाकडुन गेल्या दोन वर्षापासून तळ्यात - मळ्यात नेटवर्क येणे-जाणे सुरू आहे, सिरोंचा तालुका मुख्यालयसह ग्रामीण भागात बी.एस.एन.एल. टॉवर उभारून अनेक वर्ष होत आहे, तरीपण बी,एस,एन,एल नेटवर्कच्या प्रतिक्षेत मोबाईल धारकांची वाट सुरूच आहे.

तालुका मुख्यालयात ग्रामीण भागातून नागरिक विविध कार्यालयातील कामासाठी प्रत्येक दिवशी येत असतात अशातच तालुका मुख्यालयात बीएसएनएल नेटवर्क येना - जाणा सुरू असल्याने अनेक नागरिकांचे कार्यालयातील कामे करणे मोठी समस्या निर्माण झाले आहे,

तसेच तेलंगाना राज्यातुन येणा-या बि.एस.एन.एल. नेटवर्क लवकरात लवकर जोडण्यात यावे किंवा सिरोंचा येथे स्वतंत्र बि.एस.एन.एल. नेटवर्क फायबर रिस्टोर टीम (FRT) नियुक्त करण्यात यावे,अशी मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गाण्यारपवार, जिल्हा सरचिटणीस - चोक्कामवर, तालुका अध्यक्ष - फाजिल पाशा यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे तालुका उपाध्यक्ष - सागर मूलकला आणि पदाधिकारी व कार्यकर्ते १ जुलै २०२४ रोजी तहसील कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आली आहे,

 आंदोलनाच्या पहिल्या दिवशी अवघ्या दोन तासात बी ,एस,एन, एल, विभागाचे अधिकारी - कुमारस्वामी, तहसिलदार - तोटावर, नायब तहसीलदार- काडबाजीवार,सामाजिक कार्यकर्ता - श्रीकांत सुगरवार 

यांनी उपोषण स्थळी भेट देऊन येत्या १५ दिवसात बी,एस,एन,एल नेटवर्क सुरळीत सुरू होईल आणि लोकांची समस्या दुर होईल असे आश्वासन पत्र दिले आहे,

         आश्वासन पत्र दिल्याप्रमाणे बेमुदत साखळी उपोषण मागे घेण्यात आली आहे,

          त्यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष सागर मूलकला यांनी मीडिया समोर बोलत येत्या पंधरा दिवसात नेटवर्क समस्या दुर न झाल्यास बी,एस,एन,एल कार्यालयावर धडक मार्च काडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यानी दिला आहे,

          त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

पक्षाचे पदाधिकारी - सलाम सय्यद, शहर अध्यक्ष - सलमान शेख, कार्यकर्ते - राजकुमार मूलकला, गणेश संड्रा, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते,


PostImage

News mh33 live

June 29, 2024   

PostImage

महिला आणि मुलींसाठी सरकारने उघडली तिजोरी; आर्थिक मदतीसह शिक्षण होणार …


महिला आणि मुलींसाठी सरकारने उघडली तिजोरी; आर्थिक मदतीसह शिक्षण होणार मोफत

 

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी वित्त व नियोजनमंत्री म्हणून मार्च 2011 मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हापासून त्यांनी आज सादर केलेला दहावा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात महिला आणि मुलींसाठी विशेष योजनांचा वर्षाव दिसून आला आहे. यामध्ये मुलींसाठी मोफत शिक्षणासह पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये निधी देण्याचाही सामावेश आहे.

महिला आणि मुलींसाठी खास योजना

महिलांसाठी विविध योजना

 

-सन 2023-24 पासून ‘लेक लाडकी’ योजनेची सुरुवात- मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये -‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये-दरवर्षी सुमारे 46 हजार कोटी रुपये निधी

-दिनांक 1 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव व आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक

-पिंक ई रिक्षा - 17 शहरांतल्या 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य - 80 कोटी रुपयांचा निधी

-"शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह" योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये

-राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी 78 कोटी रुपये

-रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने- आण करण्यासाठी 3 हजार 324 रुग्णवाहिका

-जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1 कोटी 25 लाख 66 हजार 986 घरांना नळजोडणी पूर्ण- राहिलेल्या 21 लाख 4 हजार 932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर

-‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’- वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- 51 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना लाभ

-लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ

-महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ‘लखपती दिदी’, या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट

-महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’- अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन

-‘आई योजनेअंतर्गत’ पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा -10 हजार रोजगार निर्मिती

-मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित 8 लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के प्रतिपूर्ती

-या निर्णयाचा अंदाजे 2 लाख 5 हजार 499 मुलींना लाभ-सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा भार


PostImage

Khabar24

June 27, 2024   

PostImage

सुरजागड ईस्पात कंपनी तर्फे नोट बुक व साडी वाटप, मंत्री …


*अहेरी:*- नजीकच्या वडलापेठ येथे शनिवार 22 जून रोजी सूरजागड ईस्पात कंपनी व मियाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना नोट बुक, पुस्तके व स्कूल बॅग आणि महिला भगिनींना साडीचे वाटप करण्यात आले.

     नोट बुक व साडी वितरण कार्यक्रमात उदघाटन स्थानी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम होते तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धराव बाबा आत्राम, पोलीस पाटील निरंजन दुर्गे, आदिवासी सेवक डॉ.चरणजित सिंग सलुजा, प्रमोद इश्टाम, आदी मान्यवर उपस्थित होते.

     या प्रसंगी उदघाटनीय स्थानावरून मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे मुख्य स्त्रोत असून आजचे विद्यार्थी भविष्यातील देशाचे आधारस्तंभ असून विद्यार्थी उतमोत्तम व दर्जेदार शिक्षण घेऊन स्वतःचे, कुटुंबाचे, गावाचे पर्यायाने राज्याचे उज्ज्वल भविष्य घडवावे आणि नाव लोकीक करावे असे म्हणत मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

     तदनंतर मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना नोटबुक, पुस्तके, स्कूल बॅग आणि महिला भगिनींना साडी वितरीत करण्यात आले. त्यामुळे शालेय विद्यार्थी व महिला भगिनींमध्ये उत्साह संचारले होते.

   प्रास्ताविक पोलीस पाटील निरंजन दुर्गे यांनी तर सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले. 

   यावेळी बहुसंख्येने शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला भगिनी, वडलापेठ व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.


PostImage

Khabar24

June 27, 2024   

PostImage

अहेरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना (उद्दव बाळासाहेब ठाकरे)जिल्हा प्रमुख रियाज शेख …


 अहेरी तालुका प्रतिनिधी 

अहेरी :-नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे डाँ. नामदेव किरसान साहेब यांना उमेदवारी मिळाली असता आघाडीचा धर्म पाडून काँग्रेस सोबत शिवसेनेचे (उबाठा)पदाधिकारी व शिवसैनिक भर उन्हात जोमाने प्रचार करण्यास प्रारंभ केले. परंतु जिल्हा प्रमुख व संपर्क प्रमुख या दोघांनी बीजेपीशी संगनमत करून शिवसेना पदाधिकाऱ्यांना एकच दिवस प्रचार नन्तर प्रचार बंद करण्यास लावले म्हणूनच गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, अहेरी व गडचिरोली या तिन्ही विधानसभा पैकी अहेरी विधानसभेमध्ये कमी प्रमाणात मतदानाचा लीड मिळाला हि वस्तुस्थिती आहे. यापूर्वी हि नगरपंचायतच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षाशी हात मिळवणी करून स्वतःच्या पक्षातील उमेदवारांना पडण्याचा षडयंत्र रचून विजयी होणाऱ्या अनेक उमेदवार पराभूत झाले.

यावरून जिल्हा प्रमुखांचे पक्षांतर्गत कार्यप्रणाली संशयास्पद आहे. स्वतःचे एक छत्र राज्य चालण्यासाठी पदाधिकारी व शिवसैनिक यांच्यात लावालावीचे धोरण राबवित असल्याने शिवसैनिकामध्ये एकजूटता राहिलेला नाही. पक्षात नवीन पक्षप्रवेशीत शिवसैनिकांना शिवसेनेत सामावून न घेता त्यांच्याशी पक्षपात करून नाउमदे करतात सेनाभवनातून निघालेल्या आदेशान्वये शिवसेना वर्धापन दिन, जयंती, पुण्यतिथी इतर कार्यक्रम न राबविता या सर्व कार्यक्रमांच्या नावाने वर्गणी गोळा करण्याचे धोरण सुरु असते त्यामुळे आम्ही जेव्हा याच कार्यक्रमासाठी सुरजागड लोहखाण अधिकारीऱ्यांना भेटले असता ते सरळ म्हणतात की,आम्ही जिल्हा प्रमुख यांना वर्गणी दिल्यामुळे पुन्हा तुम्हाला आम्ही काहीच मदत करू शकत नाही.जिल्हा प्रमुख असेही म्हणाले की, मी जिल्हा प्रमुख आहे सर्वाना मी सांभाळतो, कोणीच तुम्हच्या पर्यंत येणार नाही फक्त माझ्या शिवाय कोणालाच काही आर्थिक मदत करू नये.अशा परिस्थितीत याबाबत जनतेत आम्हा पदाधिकाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नाना उत्तर द्यावे लागत आहे.

अहेरी विधानसभा अंतर्गत मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड व अहेरी या पाच तालुक्यापैकी भामरागड व सिरोंचा मध्ये अजून पर्यंत अधिकृत तालुका प्रमुखांची नावे जाहीर झाले नाही. या पाचही तालुक्यात एक सुद्धा शाखा उघडण्यात आले नाही. एकही गावात शिवसेना पक्षाचा फलक लावण्यात आले नाही.वरिष्ठ पातळीवर कार्यक्रमासाठी अधिकृत पदाधिकाऱ्यांना सोबत घेत नाही तसेच त्यांना कल्पना देत नाही.जिल्हा प्रमुख पक्षाचा काम निष्ठेने न करता स्वतःचा आर्थिक विकास करून घेणे हा एकच धोरण राबवित आहे.

शिवसेना पक्षात जिल्हा प्रमुख पद फार महत्वाचे सर्वोपरी असते पण अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख हे हुकूमशाही पद्धतीने पदाधिकाऱ्यावर मानसिक दबाव टाकून त्यांचा खच्चीकरण करीत असतो.शिवसैनिकांमध्ये अंतर्गत कलह निर्माण करतो. पदाधिकारी यांना मानसन्मान मिळत नाही. याबाबत जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या नजरेत आणून दिल्या नंतरही संपर्क प्रमुख हे जिल्हा प्रमुखांची बाजू घेतात यावरून अशी शंखा निर्माण होते की, संपर्क प्रमुख व जिल्हा प्रमुख यांच्यात फार मोठा आर्थिक व्यवहार झाला की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

सिरोंचा येथील पुष्कर मेळाव्यासाठी एकंदरीत 74 लाखांचे कामे पक्षांकडून मिळाले असता पक्षातील एकाही पदाधिकाऱ्यांना विस्वासात न घेता स्वतःच विल्हेवाट लावला याचा पक्षाला काहीच लाभ झाला नाही पक्षातील पदाधिकाऱ्यांची आर्थिक फसवणूक करीत असल्याने याबाबत सेनाभवनात एक बैठक घेऊन रक्कम परत करण्याचा आस्वासन दिले परंतु अद्याप रक्कम परत केले नाही.त्या मुळे पक्ष संघटनेला तळा पोहचत आहे.

या सर्व कारणाने सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत आहे असे आजच्या पत्रकार परिषदेत अरुणभाऊ धुर्वे, उपजिल्हा प्रमुख, बिरजूभाऊ गेडाम, अहेरी विधानसभा संघटक, दिलीपभाऊ सुरपाम, युवासेना जिल्हा प्रमुख, अहेरी विधानसभा, वैभव ठाकूर, वसंत आलाम, संजय फुलोरे व इतर शिवसैनिक आपले मत व्यक्त केले.

जय महाराष्ट्र


PostImage

News mh33 live

June 26, 2024   

PostImage

I, Dr. नामदेव किरसान, म्हणत खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी …


I, Dr. नामदेव किरसान, म्हणत खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी इंग्रजीतून घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ

 

गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र अस्तित्वात आल्यापासून इंग्रजी मध्ये सदस्यत्वाची शपथ घेणारे पहिलेच खासदार 

 

गडचिरोली :: 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला दिल्ली येते सुरुवात झाली असून, नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी नवी दिल्ली येथील संसदेत लोकसभेच्या सभागृहात पार पडले. 

I, Dr. नामदेव किरसान, म्हणत 12 - गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी इंग्रजीतून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. 

 प्रोटेम स्पीकर महताब भरतूहारी यांनी लोकसभेतील सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली. विशेष बाब म्हणजे गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र अस्तित्वात आल्यापासून इंग्रजी मध्ये सदस्यत्वाची शपथ घेणारे आणि इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेवर चांगला प्रभूत्व असणारे डॉ. नामदेव किरसान हे पहिलेच खासदार आहे.


PostImage

News mh33 live

June 26, 2024   

PostImage

काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून हनमंतु गंगाराम मडावी …


काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून हनमंतु गंगाराम मडावी यांची फेरनियुक्ती

 

गडचिरोली: आल्लापल्ली येथील सेवाभावी ,काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सेवानिवृत्त वन अधिकारी हनमंतु गंगाराम मडावी यांची काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडी विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून फेरनियुक्ती आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुरेश चिंचोळकर यांनी 22 जून रोजी केली आहे.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात मडावी यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचेसमवेत काँग्रेसचे युवा नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यावर विश्वास दाखल करून आपल्या समर्थकांसह भारतीय राष्ट्रीय  काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश केले होते.काँग्रेस पक्षात प्रवेशानंतर पक्षाचे  हायकमांडने कंकडालवार यांची अहेरी विधानसभा समन्वयक म्हणून तर मडावी यांची आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केले होते.

अजयभाऊ कंकडालवार व हनमंतु मडावी या दोन्ही नेत्यांचे पक्षप्रवेश व नियुक्तीचे फलित लोकसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रात मविआ व काँग्रेसचे उमेदवार डॉ.किरसान यांना मिळालेल्या भारी लीडमधून सगळ्यांनाच पाहायला मिळाली.असे असतांना सुद्धा पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून दुसऱ्या एका कार्यकर्त्यांची निवड झाल्याची माहिती सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्याने याबद्दल मडावी समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती.

एकाच पदाचे दोन दोन जिल्हाध्यक्ष निवडीबद्दलची तक्रार राज्याचे विरोधी पक्षनेते यांच्या कानावर पडताच त्यांनी लगेच याविषयी पक्षश्रेष्टींसोबत चर्चा करून परत आल्लापल्ली येथील हनमंतु गंगाराम मडावी यांच्या नावाने आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून फेरनियुक्ती करायला भाग पाडले.

काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून फेर नियुक्ती झाल्याबद्दल हनमंतु मडावी यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार, आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुरेश चिंचोळकर,जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,ऍड.राम मेश्राम,ज्येष्ठ नेते हसनभाई गिलानीसह  पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.